पंतप्रधानांची हजार भाषणे ;पण संसदेत पाच वर्षे ‘मौन ‘ !

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे मौन बाळगत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी त्यांनी गेल्या दहा वर्षात  एक हजाराहून अधिक भाषणे केली आहेत असे स्पष्टीकरण  पंतप्रधान कार्यालयाचे जनसंपर्क सल्लागार पंकज पचौरी यांनी शुक्रवारी दिले असले तरी पाच वर्षात संसदेत  ते बोलले नाहीत अशी कबुलीही दिली आहे. 

देशाच्या पंतप्रधानांनी जनतेशी जितका संवाद साधला पाहिजा तितका डॉ.मनमोहन सिंग यांनी साधला नाही असा आरोप विरोधक करत आहेत. मात्र प्रसारमाध्यमामुळेच त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना पचौरी यांनी सांगितले.मात्र पंतप्रधानांच्या भाषणाची दखल टिव्ही मिडियापक्षा वृत्तपत्रांनी अधिक घेतली आहे. असेही ते म्हणाले.काँग्रेसच्या प्रचारसभेतील पंतप्रधानांच्या हजेरीबाबत ते म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी चार प्रचारसभेत मनमोहन सिंग यांनी हजेरी लावली होती. पंतप्रधानांनी प्रचारसभेत भाषण करावे की नाही हा पक्षाचा निर्णय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Comment