छोटा शकीलचा शुटर जेरबंद 

मुंबई  – कुख्यांत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिम याचा खास हस्तक छोटा शकील याचा फरार सैय्यद अरिफअली मुबस्सीर हुसैन (30) जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट आठला यश आले आहे. सैय्यद हुसैन हा फरारी आरोपी असून, तो छोटा शकीलचा शार्प शुटर म्हणुन ओळखला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंबादास पोटे यानी दिली.

 लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर अंडरवर्ल्डमधील नामचीन गुंडाच्या मुसक्या आवळण्यास गुन्हे अन्वेषण विभागाने सुरुवात केली होती. त्यानुसार युनिट आठला सैय्यद हुसैन हा छोटा शकीलचा शार्प शुटर जोगेश्वरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार पोलिसानी सापळा रचुन हुसैन याला अटक केली. यावेळी छोटा शकीलच्या सांगण्यावर एका कामाला अंतिम स्वरुप देण्याकरीता तो या परिसरात आल्याची माहिती पोलीस चौकशीत दिली.

 हुसैन याच्यावर मरिन लाईन्स येथील शिवसागर हॉटेलच्या मालकाला खंडणी मागितल्याचा आरोप असून, याप्रकरणी त्याने त्याना जीवे मारण्याची देखील प्रयत्न केला होता. मात्र सदर प्रकरणात हेटेल मालाकाच्या वॉचमनची हत्या झाली होती. या सदर प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment