
भारतात एकच चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेतून काढण्याचा ट्रेंड अजून रुळलेला नाही. फार फार तर इंग्रजी सबटायटल्स देऊन चित्रपट प्रदर्शित केले जातात. लवकरच हिंदी आणि इंग्रजीत चित्रपट काढण्याची पद्धत सुरू होईल, असे वाटते. विद्या बालनचा सुपरहिट चित्रपट कहाणी इंग्रजीतून काढण्याचा निर्णय निर्माते सुजॉय घोष यांनी घेतला आहे. यश राज बॅनरअंतर्गत तयार झालेल्या चित्रपटाचे इंग्रजी रूप लवकरच येईल, अशी आशा आहे. या चित्रपटाचा सिक्वल काढण्याचा इरादा नसल्याचे सुजॉय घोष यांनी सांगितले. चित्रपटातील बॉब बिश्वास हे पात्र अतिशय लोकप्रिय झाले होते. त्याचेच सूत्र पकडून सिक्वल करावा, असे त्यांना अनेकांनी सांगितले. मात्र, एका कॅरेक्टरसाठी पूर्ण चित्रपट करण्यात अर्थ नाही, त्यापेक्षा इंग्रजीतून हा चित्रपट आणावा, असे सुजॉय घोष यांना वाटते.
