साताऱ्याच्या अवलियाने बनवले भारतीय बनावटीचे विमान

make-in-india1
मुंबई: भारतीय बनावटीचे पहिले-वहिले विमान ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमात पाहुण्यांचे लक्ष वेधण्यासाठी सज्ज झाले असून या विमानाची निर्मिती साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील अमोल यादव यांनी केली आहे.

२००८ पासून हे विमान तयार करण्यासाठी अमोल प्रयत्नशील होता. तब्बल ४ कोटी रुपये हे विमान तयार करण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. हे विमान मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

मी वैमानिक असल्यामुळे मला हवाईदलाबद्दल माहिती आहे. सर्व विमाने भारतात आयात केली जातात. येथे विमान बांधणी होतच नाही. आम्ही मित्रांनी अमेरिकेत विमान खरेदी केले. त्या विमानवरच आम्ही प्रशिक्षण घेतले. त्यावेळी विमान शिकणे आणि बनवणे हे अवघड नसल्याचे जाणवले. पण त्यासाठी कोणी पुढाकार घेत नव्हते, तो पुढाकार मी घेतल्याचे अमोल म्हणाले.

गेल्या १७ वर्षांपासून या क्षेत्राशी अमोल हे निगडीत आहेत. अमोल यांनी बनवलेले हे तिसरे विमान आहे. पहिले पूर्ण झाले नव्हते, दुसऱ्या विमानाला परवानगी मिळाली नाही, तर आता बनवलेल्या या विमानाला २०११मध्ये परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्याची प्रक्रिया सुरु असल्याचे अमोल यांनी सांगितले. सध्या भारतामध्ये मोठी विमाने वापरली जातात ती मोठ्या-मोठ्या शहरांतच उड्डाणे घेतात. पण भारतासाठी भारतीय बनावटीचे हे विमान बनवल्याचे अमोल यादव यांनी अभिमानाने सांगितले. या विमानाने महाराष्ट्रातील ३० शहरे जोडण्याचा विचार अमोल यांचा आहे.

Leave a Comment