लेझर प्रोजक्शन माऊस आला

adin-mouse
आत्तापर्यंत वायरवाले व वायरलेस माऊस युजर्सच्या हाती चांगलेच रूळले आहेत मात्र आता युजरना लेझर माऊसही उपलब्ध झाला असून ऑडइन ब्रँडने जगातला पहिलावहिला लेझर माऊस बाजारात आणला आहे. हा पहिला प्रोजेक्शन माऊसही आहे.

कंपनीने या माऊसला रोबोसारखा आकार दिला आहे. त्यामुळे त्याच्याकडे पाहिल्यास हा माऊस आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या माऊसमधून जे लेझर निघतात, त्यांच्या मदतीने युजर संगणक ऑपरेट करू शकतो. हा माऊस संगणकाला कनेक्ट झाला की त्यावरचे लाईट ऑन होतात व माऊस सुरू आहे हे कळते. आकाराने हा माऊस नॉर्मल माऊसपेक्षाही छोटा आहे. काळा. चंदेरी व हिरव्या रंगात तो उपलब्ध असून त्याची ऑनलाईन किंमत आहे २८०० रूपये. हा माऊस अनेक सरफेसवर काम करू शकतो.

Leave a Comment