गुगलसाठी सुंदर पिचाई हवेतच

sundar
गुगलच्या सीईओपदी नेमले गेलेले सुंदर पिचाई ही भारतासाठी अभिमानाची बाब ठरली असतानाच पिचाई यांनी आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गुगलच्या टू बिग टु लूझ श्रेणी क्लब मध्ये लॅरी पेज, सर्जी ब्रिन व एटक स्मिथ यांच्याबरोबरच आता सुंदर पिचाई यांचाही समावेश केला गेला आहे. या श्रेणीचा अर्थ असा की यातील कोणालाही गमावणे गुगलसाठी फार महागात पडणार आहे. याचाच अर्थ सुंदर गुगलसाठी अतिशय महत्त्वाची व्यक्ती ठरले आहेत.

गुगलच्या एल्फाबेट फायलिंग मध्ये पिचाई प्रथमच १० के फायलिंगच्या रिस्क सेक्शनमध्ये समाविष्ट झाले आहेत. म्हणजे या यादीतील लोकांची सेवा बंद केली तर गुगल त्यांची व्यवस्था धोरणे राबवूच शकणार नाही. त्या दृष्टीने या यादीतील व्यक्ती गुगलसाठी अतिमहत्त्वाच्या आहेत. पिचाई यांना या यादीत येण्याचे बक्षीसही मिळाले आहे. त्यांना कंपनीने स्टॉकमधील १८३ दशलक्ष म्हणजे १२४८ कोटी रूपयांची हिस्सेदारी दिली आहे.

Leave a Comment