ब्लॅकबेरीच्या २०० कर्मचाऱ्यांना डच्चू!

blackberry
टोरंटो : एकेकाळच्या आघाडीवर असणाऱ्या ‘ब्लॅकबेरी’ या मोबाईल निर्माता कंपनीचे सध्या बुरे दिन सुरू असल्याचे म्हणावे लागेल. आपल्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना ब्लॅकबेरी लवकरच डच्चू देणार असल्याचे वृत्त आहे. ओन्टॅरिओ आणि फ्लोरिडा स्थित आपल्या हेडकॉर्टर्समध्ये ‘कॉस्ट कटिंग’च्या नावाखाली कर्मचाऱ्यांना नारळ दिला जात आहे. एक वर्षापूर्वी म्हणजेच २८ फेब्रुवारी २०१५ रोजी ब्लॅकबेरीमध्ये ६२२५ कर्मचारी कार्यरत होते. पण, आता कंपनीत किती कर्मचारी आहेत, याबद्दल कोणतीही माहिती देण्यास कंपनीने नकार दिला आहे.

Leave a Comment