पुन्हा एकदा लेईकोच्या स्मार्टफोनचा सेल

le-1-s
मुंबई – भारतीय बाजारपेठेत दमदार पदार्पण केलेल्या लेईको कंपनीच्या ‘एलई १ एस’ मॉडेलने भारतीय ग्राहकांना चांगलीच भुरळ घातली आहे. भारतीय बाजारपेठेत ‘एलई १ एस’ या स्मार्टफोनला खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने ‘ले मॅक्स’ आणि ‘एलई १ एस’ हे या मॉडेल्स सादर केले होते.

लेईको कंपनीने ग्राहकांचा प्रतिसाद पाहता ९ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सेल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर १०,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असून यासोबतच फ्लिपकार्ट अँक्सिस बॅंकेच्या कार्ड उपभोक्तांना १० टक्के कॅश बॅक सुद्धा देत आहे. ‘एलई १ एस’या मॉडेलची एका दिवसासाठीच ऑनलाईन विक्री करण्यात आली होती. त्यावेळी अवघ्या २ सेकंदांमध्ये तब्बल ७० हजार स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा कंपनीने केला होता.

Leave a Comment