मनातील गोष्टी ओळखणाऱ्या यंत्राची निर्मिती!

brain
वॉशिंग्टन – येथील विद्यापीठात माणसाच्या मनातील गोष्ट समजून घेण्याचे तंत्र आणि यंत्र तयार करण्यात आले असून माणसाच्या मनातील गोष्ट ९६ टक्केपर्यंत अचूकपणे ओळखण्याचे काम या यंत्राद्वारे केले जाऊ शकते. मेंदूतून आलेले संदेश एकत्र करून त्यांचे विश्लेषण करून लोकांचे विचार जाणून घेण्याचा प्रयोग संशोधकांनी यशस्वी केला आहे.

मोठ्या प्रमाणात माणसाचे मन ओळखणाऱ्या या यंत्राचा फायदा होणार असून जे लोक विकलांग आहेत त्यांना मेंदूचे संदेश अवयवांपर्यंत न पोहोचल्याने हालचाली करता येत नाहीत. ही अडचण या संशोधनातून दूर होऊ शकते. फेफरे किंवा अपस्माराचा विकार असलेल्या रुग्णांवर अमेरिकेतील हाबरेव्ह्य़ू मेडिकल सेंटर येथे प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये या प्रयोगाला मोठे यश आल्याचे लक्षात आले. तसेच हे यंत्र ब्रेन मॅपिंगसाठी वापरता येईल व कुठल्या माहितीवर मेंदूतून काय प्रतिसाद येतो हे कळू शकणार आहे. गुन्हेगारांच्या मनातील ओळखण्यासाठी याचा उपयोग होऊ शकले असेही सांगण्यात येत आहे. प्लॉस काँप्युटेशनल बायॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. भारतीय संशोधकाचा या यंत्रनिर्मितीत महत्वाचा वाटा आहे.

1 thought on “मनातील गोष्टी ओळखणाऱ्या यंत्राची निर्मिती!”

Leave a Comment