एचटीसीने भारतात लॉन्च केला नवा स्मार्टफोन

htc
नवी दिल्ली – भारतीय बाजारात तैवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी एचटीसीने आपला नवा मिडरेंज एचटीसी डिझायर ६२६ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. १४,९९० रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत असून हा फोन पुढील महिन्यात उपलब्ध होणार आहे.

फोनला डिस्प्ले एचडी असून तो ७२०X१२८०च्या रेझोल्यूशन क्वॉलिटीला सपोर्ट करतो. कंपनीने सध्या ऑपरेटिंग सिस्टीमबाबतील कोणतीही माहिती दिली नाही. यात सेंस यूजर इंटरफेसचा वापर करण्‍यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये २जीबी रॅमसोबत मीडियाटेक कंपनीचे एमटी६७५२ ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. १.७ GHz च्या स्पीडवर हा फोन काम करतो. सोबत फोनमध्ये १६जीबी इंटरनल मेमरी आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत मेमरी वाढवता येते. यात १३ मेगापिक्सलचा रिअर व ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आहे. दोन्ही कॅमेरातून फुल-एचडी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. यात २०००mAh पॉवरची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment