ई-कॉमर्समुळे दीड लाख नोक-यांची निर्मिती

e-commerce
नवी दिल्ली – चालू वर्षात ऑनलाईन व्यवहारामध्ये वाढ झाल्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये दीड लाख नोक-यांची निर्मिती होणार असून या क्षेत्रातील नोक-यांमध्ये जवळपास ६० ते ६५ टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित असल्याचा अंदाज एका अहवालात करण्यात आला आहे.

असोचेमने सादर केलेल्या एका अहवालानुसार, जास्तकरून ई-कॉमर्स विभाग आणि कंपन्या यांच्या व्यवसायामध्ये मागील दोन वर्षामध्ये वाढ होत आहे. ही वाढ उद्योग व विकास यासाठी मोठी संधी आहे. २००९ मध्ये देशाचा ई-कॉमर्स व्यवसाय ३.८ अब्ज डॉलर होता. २०१४मध्ये वाढ होत तो १७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. २०१५ मध्ये हा व्यवसाय २३ अब्ज डॉलरलर गेला असून तो २०१६ च्या अखेरपर्यंत ३८ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकऱयांच्या अनेक संधी निर्माण होण्यासाठी मोठा वाव असल्याने अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment