लेनोवो भारतांतील स्मार्टफोन उत्पादन दुप्पट करणार

lenovo
चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोवो भारतातील स्मार्टफोन उत्पादन वाढविणार असून चेन्नई येथील युनिटमध्ये हे उत्पादन जवळजवळ दुप्पट केले जाणार आहे. या प्रकल्पात सध्या वर्षाला ६० लाख फोन तयार होत आहेत हे प्रमाण वर्षाला १ कोटी फोनवर नेले जाणार आहे. मोटोरोलाचे अधिग्रहण केल्यानंतर लेनोवो जगातील तीन नंबरची स्मार्टफोन उत्पादक कंपनी बनली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतातील प्रकल्पातून कंपनी मोटोरोला व लेनोवोचे स्मार्टफोन आयातही करणार आहे. तसेच कस्टमाईज प्रोग्राम ऑटोमेकर भारतातही सुरू केला जाणार आहे. युजर यामुळे मोटोरोलाचे स्मार्टफोन तसेच मोटो ३६० स्मार्टवॉच कस्टमाईज करू शकतील. म्हणजे आपल्या गरजेनुसार डिझाईन करून घेऊ शकतील. यंदाच्या वर्षात अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी भारताच्या मेक इन इंडिया योजनेत रस दाखविला असून श्याओमी, जिओनी यांनी आंध्रात तर विवोने दिल्ली एनसीआर मध्ये सेटअप लावले आहेत.

Leave a Comment