मायक्रोसॉफ्टचे दोन नवे स्मार्टफोन लाँच

microsfot
नवी दिल्ली- विंडोज १० वर आधारित दोन नवीन स्मार्टफोन मायक्रोसॉफ्टने भारतात लाँच केले असून या स्मार्टफोनची नावे ‘लुमिया ९५०’ आणि ‘लुमिया ९५० एक्सएल’ अशी आहेत. ११ डिसेंबरपासून या दोन्ही स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे.

४३ हजार ६९९ रुपये ‘लुमिया ९५०’ ची किंमत तर ४९ हजार ३९९ रुपये ‘लुमिया ९५० एक्सएल’ची किंमत आहे. सोमवारपासून या स्मार्टफोनची प्री-ऑडर बुकींग सुरू करण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच रिटेल शॉपवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

‘लुमिया ९५०’ चे फिचर्स – » ५.२ इंच डिस्प्ले » विंडोज १० » १४४० x २५६० पिक्सल रेझोल्यूशन » १.८ गिगाहर्टझ हेक्सा कॉअर प्रोसेसर » तीन जीबी रॅम » २० मेगापिक्सेल रिअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » ३२ जीबीची इंटरनल मेमरी » ३००० एमएएच बॅटरी » किंमत ४३ हजार ६९९

‘लुमिया ९५० एक्सएल’ चे फिचर्स – » ५.७ इंच डिस्प्ले » विंडोज १० » १४४० x २५६० पिक्सल रेझोल्यूशन » १.८ गिगाहर्टझ ऑक्टाकॉअर प्रोसेसर » तीन जीबी रॅम » २० मेगापिक्सेल रिअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » ३२ जीबीची इंटरनल मेमरी » ३३४० एमएएच बॅटरी » किंमत ४९ हजार ३९९

Leave a Comment