६० वर्षांहून अधिक काळ स्त्रीपुरूष समतोल सांभाळणारे गांव

zanzali
चीनमध्ये गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेली वन चाईल्ड पॉलिसी आता थोडी ढिली झाली आहे. या पॉलिसीमुळे स्त्री पुरूष रेशोचा समतोल ढळला आणि चीनमध्ये अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली. मात्र चीनच्याच गुईझोऊ प्रांतातील झानली गावाने गेली ६० वर्षांहूनही अधिक काळ स्त्रीपुरूष रेशो काटेखोर सांभाळला आहे. व यासाठी तेथे खास जडीबुटींचा वापर केला जातो. या गावाच्या या पराक्रमाने चीनमधील संशोधकांनाही त्यांचे लक्ष वळविण्यास भाग पाडले आहे.

या गावात प्राचीन जडीबुटींचा वापर स्थानिक लोक अनेक वर्षे करत आहेत. या गावात प्रत्येक जोडप्याला दोन मुले आहेत. पैकी एक मुलगा आणि एक मुलगी. चीनच्या वन चाईल्ड पॉलिसीचे बंधन ग्रामीण भागात नव्हते त्यामुळे येथे दोन मुले परवानगी होतीच. मात्र येथील गावकर्‍यांनी गावाच्या स्थापनेपासूनच कुटुंब नियंत्रणाचा मंत्र जपला. गावाची लोकसंख्या १९५९ पासून वाढलेली नाही. लोकसंख्या आहे ८२३. हा समाज चीनमधील अल्पसंख्यांकांच्या ५६ समुदायांपैकी एक आहे. येथे गावाबाहेर लग्न करण्याची परवानगी नाही.

लग्नानंतर जोडप्याला जर प्रथम मुलगा झाला तर दुसरी हमखास मुलगी होते. अर्थात उलटही. हे घडवून आणण्यासाठी परंपरागत जडीबुटीचे सेवन करून बाळाचे लिंग ठरविले जाते. प्रत्येक जोडप्याला लग्नातच जास्त मुले होऊ देणार नाही अशी शपथ घ्यावी लागते. शपथ मोडणांर्‍याला गावाबाहेर काढले जाते. येथील मुलगा अथवा मुलगी होण्यासाठी हमखास उपयुक्त ठरलेल्या जडीबुटींचे खास संरक्षण केले जाते.अर्थात यामुळे संशोधकही कोड्यात पडले असून यामागचे रहस्य उलगड्यासाठी खास संशोधन केले जात आहे.

Leave a Comment