मायक्रोमॅक्सने लॉन्च केला स्वस्त आणि मस्त ४जी स्मार्टफोन

micromax
मुंबई : कॅनव्हास सीरिजमधील नवा स्मार्टफोन मोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सने लॉन्च केला असून या स्मार्टफोनचे नाव ‘कॅनव्हास पेस ४जी’ असे असून याची किंमत ६ हजार ८२१ रुपये एवढी आहे.

काय नवीन आहे ‘कॅनव्हास पेस ४जी’मध्ये – यात १ जीबीचे रॅम आहेत आणि याचा प्रोसेसर १.१GHz क्वाडकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचा आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉपवर आधारित आहे. याचा रिअर कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. यात ७ जीबीची इनबिल्ट स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे, तर ३५ जीबीपर्यंत स्टोरेज क्षमता वाढवण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्लूटूथ, वाय-फाय कनेक्टिव्हिटीया सुविधा देखील देण्यात आली आहे. याच्या बॅटरीची क्षमता २५०० mAh एवढी आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरीची ९ तासांपर्यंत टॉक टाईम आणि ३७५ तासांपर्यंत स्टँडबाय क्षमता असल्याचा दावा मायक्रोमॅक्सने केला आहे. काळ्या रंगामध्ये उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘e-bay’वर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Leave a Comment