फेसबुकमधील पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पॅटर्निटी लीव्ह

facebook
सॅन फ्रॅन्सिस्को : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने त्याच्या पुरुष कर्मचाऱ्यांनाही पॅटर्निटी लीव्ह देण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय त्याने आपण स्वतः दोन महिन्यांच्या पॅटर्निटी लीव्हवर जात असल्यामुळे घेतला आहे. आपल्या फुल टाईम कर्मचाऱ्यांना फेसबुक कंपनी बाळाच्या जन्मानंतर चार महिन्यांची सुट्टी देणार असून ही सुट्टी फुलपगारी असणार आहे.

या योजनेचा लाभ एक जानेवारीपासून पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. फेसबुकच्या माहितीनुसार अमेरिकेबाहेरील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाळाच्या जन्मानंतर चार आठवड्यांची सुट्टी मिळते. मात्र आता या सुट्टीत वाढ करण्यात येणार असल्यामुळे आता बाळाच्या आईसह वडिलांनाही बाळाच्या संगोपनासाठी चार महिन्यांची भरपगारी सुट्टी मिळणार आहे. अमेरिकेच्या बाहेरील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. केवळ मुलाच्या जन्मानंतरच नव्हे तर एखादे जोडपे बाळ दत्तक घेत असेल तर त्यांनाही सुट्टी मिळणार आहे, असे फेसबुकच्या एचआर हेड लॉरी मेटलॉफ गोलर यांनी सांगितले. तसेच बाळाच्या जन्मानंतर फेसबुक त्या कर्मचाऱ्याला ४ हजार डॉलरचा बोनसही देणार आहे.

Leave a Comment