नोकियाचा बहुप्रतिक्षित सी वन स्मार्टफोन येतोय

nokia
नोकियाच्या बहुप्रतिक्षित सी वन या स्मार्टफोनचे फोटो टेक साईटवर लीक झाले आहेत. या वर्षाच्या सुरवातीलाच फिनलंडच्या नोकियाने कंपनी स्मार्टफोन बाजारात आणत असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या फोनबाबत चर्चा सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार हा फोन अँड्राईड मार्शमेलो ६.० तसेच विंडोज १० अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमसह असेल. म्हणजे फोनची दोन व्हेरिएंट दोन वेगळ्या ओएस सह आणली जाणार आहेत. फोटोंनुसार पांढरा, सोनेरी, राखी व गुलाबी अशा चार रंगात हे फोन येतील. त्याला पाच इंची फुल एच डी स्क्रीन, ८ एमपीचा रियर तर ५ एम.पीचा फ्रंट कॅमेरा व २ जीबी रॅम अशी फिचर्स असतील असेही समजते.

Leave a Comment