मंगळावर आढळले पाण्याच्या तळ्याचे विवर

mars
केप कॅनाव्हेरल : मंगळावर एकेकाळी पाण्याची मोठी तळी अस्तित्वात होती हे सिद्ध करणारे पुरावे शास्त्रज्ञांच्या हाती आले आहेत. पाणी नष्ट झाल्याने आता या तळ्यांचे विवरात रुपांतर झाले आहे. ‘नासा’च्या ‘क्युरिऑसिटी’ या अंतराळ यानाने या विवराची छायाचित्र पाठविली आहेत. या संशोधनामुळे मंगळावर कधी तरी जीवसृष्टी अस्तित्वात असण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.

‘क्युरिऑसिटी’ने १४० किलोमीटर लांबीच्या गेल या विवराची छायाचित्र पाठविली आहेत. या विवराच्या एका टोकाला गाळाने बनलेली ५ किलोमीटरची टेकडी उभी आहे. या टेकडीमुळे तळ्यातील पाणी स्थिर होण्यास मदत झाली; असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

टेकडीच्या उत्तरेकडून तळ्यात सतत पाणी येत असावे. हे पाणी बर्फ वितळण्याने अथवा पावसामुळे येत असावे; अशी शक्यता शास्त्रज्ञानी वर्तविली आहे.
लाखो वर्षापूर्वी मंगळाने आपल्या भोवतीचे चुंबकीय संरक्षक क्षेत्र गमावले आणि सौर आणि वैश्विक किरणांच्या माऱ्यामुळे या ग्रहावरील पाणी नष्ट झाले. मात्र त्यापूर्वी मंगळावर जीवसृष्टीसाठी आवश्यक सर्व घटक उपलब्ध होते; असा दावा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी जिऑलॉजिस्टचे जॉन ग्रॉट्झिंगर यांनी केला आहे.

नुकताच दुसऱ्या एका संशोधक गटाने मंगळावर पाण्याचे प्रवाह अस्तित्वात होते; असे संशोधन प्रसिद्ध केले आहे.

Leave a Comment