तासात डिलिव्हरी अन्यथा वन प्लस मिळणार मोफत

oneplus
चायनीज स्मार्टफोन कंपनी वनप्लसने प्रमोशनसाठी वेगळाच फंडा निवडताना बंगलोर येथे वन प्लस हँडसेट ऑर्डर प्लेस झाल्याच्या क्षणापासून ६० मिनिटांच्या आत घरपोच झाला नाही तर तो मोफत दिला जाईल अशी योजना ८ ते १० आक्टोबर या काळासाठी सुरू केली आहे. ही योजना यशस्वी झाली तर भारताच्या अन्य शहरातही ती ठराविक काळासाठी राबविली जाणार आहे. डॉमिनोजच्या पिझा डिलिव्हरी मॉडेलला आदर्श ठेवून ही योजना राबविली जात आहे.

या योजनेसाठी बंगलोर येथे ब्ल्यू हॉर्न कंपनीबरोबर वनप्लसने टायअप केला आहे. त्यासाठी ग्राहकाला गुगल प्ले स्टोअरमधून ब्ल्यू हॉर्न मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. ग्राहकाकडून ऑर्डर घेतली गेली की एक तासाच्या अवधीत ग्राहकाला फोन घरपोच दिला जाणार आहे. वन प्लस टूच्या प्रमोशनसाठीही कंपनीने ओला कॅब बरोबर भागीदारी करार केला आहे. त्यानुसार कॅब राईडमध्ये कस्टमरला फ्री ऑफ चार्ज वन प्लस टूचा अनुभव घेता येणार आहे.

Leave a Comment