मारुती सुझुकीने लाँच केली देशातील पहिलीवहिली हायब्रिड डिझेल कार

maruti-ciaz
मुंबई: देशातील पहिली स्मार्ट हायब्रिड डिझेल कार सियाज SHVS सर्वात मोठ्या कार कंपनी मारुती सुझुकीने लाँच केली आहे. हायब्रिड डिझेल इंजनसह बॅटरीचाही यामध्ये वापर करण्यात आला असून ही कार हायब्रिड असल्याने इतर डिझेल कारपेक्षा ही ९% जास्त चांगलाच मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे.

२८.०९ प्रतिकिमी असा सियाज SHVS चा मायलेज असून हायब्रिड असूनही इतर डिझेल कारपेक्षा या कारची किंमत कमी आहे. या कारची सुरुवातीची किंमत ८.२३ लाख आहे.

पॉवर असिस्ट एंड ब्रेक, एनर्जी रिजनरेशन असे विविध फीचर्स या कारमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही क्लचवरील पाय बाजूला काढताच इंजिन बंद होत असल्यामुळे इंधनची खूप बचत होते. या कारमधील असे अनेक वेगवेगळे फीचर्स आहेत. ज्यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होते.

Leave a Comment