गुगलने १७ वर्षांनंतर बदलला आपला लोगो

google
नवी दिल्ली: जगातील जाईट सर्च इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगलने आपला लोगो बदलला असून आज गुगल-डुडलच्या रुपात अॅनिमेटेल आणि नव्या लूकमध्ये गुगलने लोगो लॉन्च केला आहे.

कंपनीने आपला लोगो तब्बल १७ वर्षांनंतर बदलला आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगवर आणि ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.नव्या लोगोमध्ये गुगलने लहान ‘g’ निळ्या रंगाचा केला आहे तर ‘G’चार रंगांनी मिक्स्ड केला आहे. गुगलने पहिल्यांदा काही बदल केला आहे असे नाही, यापूर्वी गुगलने सर्च, मॅप्स, जीमेल, क्रोम आणि इतर विभागांमध्ये बदल केलेले आहेत.

Leave a Comment