कार्बनचा मस्त आणि स्वस्त टायटेनियम एस २००

karboon
कार्बन या भारतीय मोबाईल फोन उत्पादक कंपनीने मंगळवारी नवीन स्मार्टफोन टायटेनियम एस २०० सादर केला आहे. स्नॅपडीलशी पार्टनरशीप करून हा फोन कंपनीने सादर केला आहे.

या स्मार्टफोनसाठी पाच इंचाचा डिस्प्ले, ऑटोफोकस व दोन एलईडी फ्लॅश लाईटसह ८ एमपीचा रियर कॅमेरा, ३.२ एमपीचा फ्रंट कॅमेरा, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी कार्डच्या सहाय्याने ३२ पर्यंत वाढविण्याची सुविधा, ड्युअल सिम अशी फिचर्स आहेत. हँडसेटमध्ये २१ भारतीय भाषा कीबोर्ड तसेच ५ भारतीय युजरफेस भाषा सुविधाही दिली गेली आहे. फोनची किंमत आहे ४९९९ रूपये.

कंपनीचे कार्यकारी अधिकारी शशीन देवसरे म्हणाले स्मार्टफोन युजरमध्ये मनोरंजनसाठी प्राथमिक स्क्रीनचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळेच कमी किंमतीतही चांगला स्क्रीन सादर करण्याची आज गरज होती. ते काम आम्ही केले आहे. कार्बनचे देशात ८५ हजारांहून अधिक रिटेल पार्टनर व ९०० हून अधिक सर्व्हिस सेंटर आहेत.

Leave a Comment