ई कॉमर्स कंपन्यात पेटणार दिवाळी युद्ध

diwali
दसरा दिवाळीचे दिवस तोंडावर येऊ लागल्याने ई कॉमर्स कंपन्यांनी फेस्टीव्ह ऑफर्सच्या तयारीला सुरवात केली आहे. बहुतेक सर्व ई कॉमर्स कंपन्या या डिस्काऊंट ऑफर्सच्या लढाईत उतरल्या असून त्यांच्यामध्ये ऐन सणात डिस्काऊंट ऑफर युद्ध रंगेल असे संकेत मिळू लागले आहेत. या सर्व कंपन्यांचे मुख्य टार्गेट मोबाईल युजर्स आहेत. ग्राहकांना वारंवार खरेदी करण्याच्या मोहात पाडण्यासाठी या कंपन्या अनेक क्लृप्त्या लढवत आहेत आणि बंपर डिस्काऊंट ऑफर जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. प्रामुख्याने सणांच्या दिवसांत होम, किचन आणि डेकॉर वस्तू खरेदीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे या वस्तूंवरच डिस्काऊंट जाहीर केले जातील असे दिसून येत आहे.

स्नॅपडीलचे उपाध्यक्ष श्रीनिवास मूर्ती यांनी डिस्काऊंट ऑफर नक्कीच जाहीर होतील पण त्यात कंपनीने ग्राहकांबरोबर त्यांच्या दीड लाखांहून अधिक संख्येने असलेल्या सेलर्सनाही समाविष्ट करून घेतले जात असल्याचे सांगितले. टायगर ग्लोबल सपोर्ट शॉप क्ल्यूज चे वरीष्ठ संचालक नितिन अग्रवाल यांनीही त्यांची कंपनी पुढच्या महिन्यात कँपेन सुरू करणार असल्यचे सांगितले. लॉयल कस्टमरसाठी खास ऑफर दिल्या जातील असे ते म्हणाले. पेटीटने वॉलेट डाऊनलोड योजनेला प्राधान्य दिले आहे.

अॅप युजर्सना अतिरिक्त ५ टक्के डिस्काऊंट, कॅशबॅक, वॉलेट पॉईंटस अशा प्रकारे ग्राहकांना लुभावण्याचा या कंपन्या प्रयत्न करतील.तसेच डिस्काऊंट व आकर्षक कॅशबॅक असा काँबो प्लॅनही सादर केला जाईल असे जाणकारांचे मत आहे.

Leave a Comment