बीएमडब्ल्यूची कॉन्सेप्ट एम फोर जीटीएस कार

bmwm4
जर्मन कार मेकर बीएमडब्ल्यूने एम फोर सिरीजमधील कॉन्सेप्ट एम फोर जीटीएस कार सादर केली आहे. ही कार रस्त्यावरून धावू शकेल आणि रेसिंग ट्रॅकवरही आपली कमाल दाखवू शकेल असे सांगितले जात आहे. ही कार वजनाला तुलनेने खूपच हलकी बनविली गेली आहे व त्यामुळे चालकाला ती अविस्मरणीय रेसिंग अनुभव देईल असा कंपनीचा दावा आहे.

कारचे फ्रंट स्प्लिटर रियर विंग परफेक्ट एरोडायनामिक्स बॅलन्ससाठी कार्बनपासून बनविले गेले आहेत. बोनेटही हलक्या वजनाच्या पदार्थापासून बनल्याने कारचे वजन कमी झाले आहे आणि कारला चांगला वेगही मिळाला आहे. डार्क ग्रे मॅटॅलिक रंगात असलेल्या या कारचे मिक्स्ड साईज टायर व फ्रंट स्प्लीटर ऑरेंज कलर मध्ये असल्याने कारला आकर्षक लूक आला आहे. कारला सहा सिलींडर इनलाईन इंजिन व इनोव्हेटिव्ह लाईट दिले गेले आहेत. या लाईटमुळे हायस्पीडवर कार चालवितानाही चालकाला दृष्य स्पष्ट दिसते. कारची किंमत तसेच ती बाजारात कधी आणली जाणार याची माहिती अद्यापी दिली गेलेली नाही.

Leave a Comment