एचआयव्हीग्रस्तांना मिळणार सिंगापूरमध्ये प्रवेश !

hiv
सिंगापूर : एचआयव्हीग्रस्त पर्यटकांबाबत दोन महत्वपूर्ण निर्णय सिंगापूर सरकारने घेतले असून देशात एचआयव्हीग्रस्त पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे; परंतु, तीन महिन्यांच्यापुढे वास्तव्य करता येणार नाही.

आरोग्य विभागाने म्हटले आहे की, देशामध्ये एचआयव्हीग्रस्तांना प्रवेश करण्यास सरकारने सन १९८० पासून बंदी घातली होती. परंतु, १ एप्रिल पासून सरकारने ही बंदी उठविली आहे. यापुढे एचआयव्हीग्रस्तांना केवळ तीन महिनेच वास्तव्य करता येणार आहे. याबाबत पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. एचआयव्हीग्रस्त पर्यटकांच्या प्रवेशाबाबत ऑस्टड्ढेलिया व न्यूझीलंड सरकारनेही काही नियम घातलेले आहेत. देशात सन २०१४ मध्ये ६६८५ एचआयव्हीग्रस्त आढळून आले आहे. यापैकी १७३७ जणांचा मृत्यू झाला आहे. एचआयव्हीचा प्रसार होऊ नये, यासाठी सरकार विविध उपाययोजना आखून काळजी घेत आहे, असे अधिका-यांनी सांगितले.

Leave a Comment