केस्ट्रेलचा पहिला स्मार्टफोन आला

kestrel
भारतीय आयसीटी निर्माता केस्ट्रेलने त्यांचा पहिला स्मार्टफोन केस्ट्रेल के एम ४५१ नावाने बाजारात सादर केला असून त्याची किंमत आहे ६१९० रूपये. अनेक ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्यांवर तो विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ड्युअल सिम, अँड्राईड किटकॅट ४.४ ओएस, ४.५ इंची एलपीएस डिस्प्ले, ५१२ एमबी रॅम, ४ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५ एमपीचा रिअर एलईडी फ्लॅशसह कॅमेरा, फ्रंट फेसिग सेकंडरी कॅमेरा एक्सलेरोमीटर, एंबियंट लाईट सेंसर व प्रॉक्सीमीटर सेंसरसह याला दिला गेला आहे. कनेक्टीव्हीटीसाठी थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, एज, जीपीआरएस, मायक्रो यूएसबी अशी ऑप्शन आहेत. ८ तासाचा टॉकटाईम व ३०० तासाचा स्टँडबाय अशी त्याची अन्य वैशिष्ठ्ये आहेत.

केस्ट्रेल मोबाईलचे सहसंस्थापक व संचालक पंकज सुरेका म्हणाले युजरला या फोनमुळे टिकाऊ, परफॉर्मन्स उत्तम व बॅटरी लाईफ अधिक असलेला फोन परवडणास्ट्रे किंमतीत उपलब्ध होत आहे. देशात कंपनीची १०० हून अधिक सर्व्हिस सेंटर आहेत व भारतात आर अॅन्ड डी तर चायनामध्ये कंपनीचे इन हाऊस टेस्टींग सेंटर आहे.

Leave a Comment