वर्ल्ड गोल्ड काउंसिलचा धक्कादायक खुलासा; शुद्ध नाहीत हॉलमार्कचे दागिने

gold-council
नवी दिल्ली- वर्ल्ड गोल्ड काउंसिलने जाहीर केलेल्या अहवालात भारतात हॉलमार्क सोन्याचे दागिन्यांची शुद्धता विश्वासपात्र नसल्याचे म्हटल्यामुळे हॉलमार्किंग सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असताना विना हॉलमार्किंग दागिन्यांचे काय? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. देशातील फक्त मोठ्या शहरात हॉलमार्किंग दागिने मिळतात. मात्र छोट्या शहरात किंवा गावांमध्ये विना हॉलमार्किंग दागिने विक्री केले जातात.

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या अहवालानुसार, भारतातील हॉलमार्कचे दागिन्यांची शुद्धता ‘ग्लोबल स्टँडर्ड’सारखी नाही.यामुळे अनेक देशांचा भारतातील सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेवर विश्वास राहिलेला नाही. त्याचा सरळ परिणाम निर्यातीवर झाला आहे.

३० टक्क्यांपेक्षा कमी हॉलमार्कचे दागिने भारतात आहेत. विशेष म्हणजे भारतातील हॉलमार्कचे सोने १०० टक्के शुद्ध नाही. देशात जवळपास ४ लाख दागिने हॉलमार्किंग आहेत. हॉलमार्किंग प्रणालीत प्रचंड चूका असल्यामुळे भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएसआय) नियमावलीत ते खरे उतरत नसल्याचे स्पष्‍ट झाले आहे.

Leave a Comment