फेसबुकचे नवे ड्रोन देणार जगभरात कुठेही इंटरनेट सुविधा !

facebook-drone
वॉश्गिंटन: इंटरनेटच्या प्रसारासाठी एक खास ड्रोन फेसबुकने तयार केले असून जगातील कोणत्याही भागामध्ये हे ड्रोन इंटरनेटची सुविधा देऊ शकतो. बोईंग ७३७ इतके मोठे या ड्रोनचे पंख असून जवळपास 90 हजार फुटापर्यंत हे ड्रोन उडू शकते.

एकदा उड्डाण केल्यानंतर हे ड्रोन ९० दिवस हवेत राहू शकते. या ड्रोनमार्फत १० गीगाबिट्स प्रति सेकंद इंटरनेट स्पीड मिळू शकतो. या वर्षाच्या शेवटी याची चाचणी अमेरिकेमध्ये होणार आहे.

या ड्रोनला युकेमध्ये फेसबुकच्या ऐरोस्पेस टीमने तयार केले असल्याचे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट, ग्लोबल इंजिनिअर जय पारिख म्हणाले. त्याचबरोबर यामध्ये अनेक आव्हान आहेत आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या दृष्टीकोनातून याची चाचणी करीत आहोत. आम्ही याचा वापर विमान, उपग्रह यासारख्या गोष्टींसाठी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील पारिख म्हणाले

फेसबुककडून सुरु करण्यात आलेल्या इंटरनेट डॉट ओआरजीच्या अंतर्गत हा नवा प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. या ड्रोनद्वारे जास्तीत जास्त लोकांना इंटरनेटशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही पारिख यांनी सांगितले. लवकरच या ड्रोनचा वापर करणार असल्याचेही पारिख यांनी सांगितले.

Leave a Comment