नासाने एलियन्सना पाठवला मराठी, हिंदीमध्ये संदेश

nasa
वॉशिंग्टन – इतर ग्रहांवर संभाव्य सजीवांसाठी नासाने अंतराळामध्ये काही संदेश पाठवले असून नासाने साऊड क्लाउडवर जो ऑडिओ पाठवले आहेत, त्यामध्ये हिंदी भाषेमध्ये नमस्कारही करण्यात आला आहे. म्हणजे जर प्रत्यक्षात अंतराळामध्ये एलियन्स असतील आणि त्यांना ऐकता येत असेल तर त्यांना पृथ्वी वासियांकडून हिंदीमध्ये ‘नमस्कार’ ही ऐकू येईल. तसेच मराठीतही संदेश पाठवण्यात आला आहे.

नासाने १९९७ मध्ये लाँच केलेल्या एका स्पेसक्राफ्टद्वारे पृथ्वीवरील अनेक आवाज साऊंड क्लाउडवर अपलोड करून अंतराळात पाठवले आहेत. त्यात हिंदी, इंग्रजीसह दुसऱ्या भाषांचाही समावेश आहे. निसर्गाशी संबधित काही आवाजांचाही समावेश आहे. पावसापासून ते आईचा आणि मुलाचा आवाज, हृदयाची धडधड, दगडांमधून निघणारा आवाज यांचा त्यात समावेश आहे.

अशा प्रकारचे आवाज पाठवण्यामागे वैज्ञानिकांचे मत आहे की, जर अंतराळात कुठे एलियन्ससारखे काही असेल तर ते हा आवाज ऐकून प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. साऊंड क्लाउडवर अपलोड केलेल्या ध्वनी संदेशांमध्ये जगभरातील 55 भाषांमध्ये अभिवादन रेकॉर्ड करण्यात आले आहे. हिंदीबरोबरच त्यात मराठी आणि बंगालीचाही समावेश आहे.

Leave a Comment