जगातील सर्वात अरूंद गल्ली, रूंदी केवळ ३१ सेंमी.

galli
जर्मनीतील रूटलिंगन शहरातील ३०० वर्षांपूर्वीची एक गल्ली जगातील सर्वात अरूंद गल्ली असून तिची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्येही करण्यात आली आहे. २००७ साली या गल्लीला जगातील सर्वात अरूंद गल्लीचा दर्जा देण्यात आला आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने विचार करायचा तर या गल्लीत पाहण्यासारखे कांहीही नाही. मात्र तरीही जगभरातील पर्यटक आवर्जून या गल्लीला भेट देतात. ही गल्ली रूंदीला ३१ सेंमी आहे आणि तिची लांबी आहे १२ फूट. या गल्लीतून जाणार्‍याला अंग चोरूनच जावे लागते. या गल्लीच्या निर्मितीमागची कथा ऐकण्यासारखी आहे. या गावात म्हणे वारंवार आगी लागतात. त्यात व्हायचे काय की घराला घरे जोडून असल्याने आग लागली की ती दुसर्‍या घरांपर्यंतही पोहोचायची आणि नुकसानीत वाढ व्हायची.

१७२६ सालीही अशीच आग लागली व आसपासची घरेही पेटली. तेव्हापासून या शहरातील दोन घरांमध्ये गॅप ठेवली पाहिजे असा नियम केला गेला त्यातून या गल्लीची निर्मिती झाली. म्हणजे ही गल्ली दोन घरांमधील गॅप आहे. १८२० साली तिला गल्लीचा दर्जा दिला गेला आणि आज ती जगातील सर्वात छोटी व अरूंद गल्ली म्हणून प्रसिद्धीस आली आहे.

Leave a Comment