अॅमेझॉनची ड्रोन ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम

drone
ड्रोनचा वापर ग्रोसरी, पिझ्झा व अन्य मालाच्या डिलिव्हरीसाठी रूळत चालला असताना आज ना उद्या ड्रोन ट्रॅफिक चा प्रश्नही उपस्थित होणार हे नक्कीच आहे. यामुळेच अमेझॉन, गुगल सारख्या कंपन्यांनी ड्रोन ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम विकसित करण्याची सुरवात केली आहे. ड्रोनचा वापर जसा वाढत जाईल तसे त्यालाही एअर ट्रॅफिक कंट्रोल गरजेचा ठरणार आहे. अॅमेझॉनने २८ जून रोजी ड्रोन मेकर्स, इंजिनिअर्स, व अन्य लोकांच्या उपस्थितीत हायस्पीड रोबो डिलिव्हरी ड्रोन पेश करताना ट्रॅफिक कंट्रोलवर समाधानकारक उपाययोजना करण्यात येत असल्याचे संकेत दिले आहेत.

अमेझॉनने पेश केलेल्या रोबो ड्रोनच्या वापरावर होणार्‍या एअर ट्रॅफिकला अॅटोमेटेड कॉम्प्युटर सिस्टीमशी कनेक्ट केले जात आहे. हे ड्रोन विमानांपेक्षा कमी उंचीवरून उडतात म्हणजे ते जमीनीपासून साधारण २०० ते ४०० फुटांवरून उडतात त्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे सुलभ जाते असे सांगितले जात आहे. सध्या चीनची ई कॉमर्स कंपनी अलिबाबा, अॅमेझॉन, गुगल व अन्य पार्सल डिलिव्हरी कंपन्यांनी या ड्रोनच्या ट्रायल घेतल्या आहेत असे समजते.

Leave a Comment