८०० पेक्षा जास्त आकाशगंगांचा संशोधकांनी लावला शोध !

galaxy
न्यूर्याक : ८५४ अल्ट्रा डार्क आकाशगंगाचा संशोधकांनी शोध लावला असून सुबारू टेलिस्कोपकडून मिळालेल्या आकड्यांच्या आधारे या आकाशगंगांची माहिती मिळाली. कोमा क्लस्टरमध्ये आढळलेल्या या आकाशगंगांमध्ये रहस्यमयी कृष्ण विवर आहेत. ज्या समूहामध्ये १,००० पेक्षा जास्त माहीती आकाशगंगा असतात त्याला कोमा क्लस्टर आकाशगंगा म्हटले जाते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या आकाशगंगांमध्ये १ टक्क्यांपेक्षा कमी आकारमान आसणारा पदार्थ दिसतो. ब्रह्मांडामधील कृष्णवीवर आणि ग्रहांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे.

संशोधकांनुसार, अब्जो वर्षांपूर्वी वायूंची कमतरता असल्याने आकाशगंगांमध्ये अंधार होता. न्यूयॉर्क येथील स्टोनी ब्रुक विद्यापीठातील जिन कोडा यांनी सांगितले की, यामध्ये ता-यांसारख्या दिसणा-या घटकांचे द्रव्यमान एक टक्का असते. यामधील काहींचा आकार आपल्या आकाशगंगेइतका आहे; परंतु त्यांची संख्या तुलनेत हजारावा भाग आहे. ४७ वर्षांपूर्वी प्रकाशरहित आकाशगंगांचा शोध लागला होता.

Leave a Comment