शांतीपूर्ण देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले

peace
जगाला शांतीचा संदेश देणार्‍या शांततापूर्ण देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरून १४३ नंबरवर गेले आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमी अॅन्ड पीस या संस्थेने सर्वेक्षण करून जाहीर केलेल्या १६२ देशांच्या यादीत आईसलँड या छोट्याश्या आणि कमी लोकसंख्येच्या देशाने मागील वर्षीप्रमाणेच अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताच्या पुढे या यादीत १६ नंबरवर भूतान, ६२ नंबरवर नेपाळ, ८४ नंबरवर बांग्लादेश, ११४ नंबरवर श्रीलंका ही शेजारी राष्ट्रे आहेत. देशातील अपराधांचा स्तर, संघर्षमय घटना आणि सैन्यीकरण ही यादी जाहीर करताना लक्षात घेतले गेले आहेत.

या यादीत युरोपमधील सहा देश आहेत. त्यात डेन्मार्क २ नंबरवर, ऑस्ट्रीया ३ नंबरवर आहे. या यादीत पाकिस्तानचा नंबर १५४ वा आहे तर अफगाणिस्तान १६० नंबरवर. या यादीत अमेरिकेचीही गतवर्षीपेक्षा पिछेहाट झाली असून अमेरिका ९४ नंबरवर तर चीन १२४ नंबरवर आहे. सर्वात तळात इराण आणि सिरीया देश आहेत.

Leave a Comment