मुंबई शेअर बाजारावर ग्रीस दिवाळखोरीचे सावट

share-market
मुंबई – आज सकाळी शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३५ अंकांनी घसरला असून त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,३०० च्या खाली घसरला आहे. ग्रीसमधील दिवाळखोरीचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांप्रमाणे भारतीय शेअर बाजारातही उमटल्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रातच बाजार ५३५ अंकांनी घसरला.

आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठयावर उभा असलेला ग्रीस युरोपियन युनियनमधून बाहेर पडला तर, त्याचे पडसाद अधिक मोठया प्रमाणावर दिसून येतील. गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यामुळे सेन्सेक्स ५३५ अंकांनी घसरुन, बीएसईचा निर्देशांक २७,२७५ अंकांवर होता.

Leave a Comment