दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ग्रीस

grece
अथेंन्स : २००८ नंतर पुन्हा एकदा एक मोठा धक्का जगाच्या अर्थव्यस्थेला बसण्याची चिन्ह दिसू लागली असून युरोपियन युनियनमधला संस्थापक देश असणारा ग्रीस आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे.

ग्रीसमधली आज सगळी एटीएम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात ग्रीसच्याच जनतेने अडीच अब्ज युरो एटीएममधून काढून घेतल्यामुळे एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याचे पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी जाहीर केले आहे.
ग्रीसच्या अर्थव्यवस्थेला अथेंन्समध्ये झालेल्या ऑलिंम्पिकनंतर उतरती कळा लागली. देश कर्जाच्या ओझ्याखाली दबला. सध्या ग्रीसवर वेगळवेगळ्या कर्जदाराचे ३०७ अब्ज युरोंचे कर्ज आहे. हे कर्ज देताना ग्रीसच्या सरकारवर खर्च कपातीचे विविध निर्बंध लादण्यात आले आहेत.

Leave a Comment