कोलकात्याच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये छोट्या स्कर्टवर बंदी

scotish-chruch
कोलकाता – गोल गळ्याचा टी-शर्ट आणि छोट्या स्कर्ट्सवर येथील स्कॉटिश चर्च कॉलेजने बंदी घातली असून विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. विद्यार्थ्यांनी सभ्य वेषभूषा करावी तसेच शैक्षणिक वातावरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन नम्रता आणि स्वच्छता तसेच सुरक्षिततेची अपेक्षा असल्याचे यासंदर्भात लावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

या नोटीसमध्ये शैक्षणिक वातावरणाला पोषक पेहराव करुनच यावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वेगवेगळी अवतरणे असलेल्या टी शर्ट आणि टॉपवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर फुलपँट आणि किमान गुडघ्यापर्यंत लांब स्कर्टचाच वापर करावा असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुलांना कानातील बाळी आणि स्टड वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर साडी आणि सलवार कमीजही योग्य प्रकारे वापरली पाहिजे असाही सल्ला देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विश्वासात न घेताच अशा प्रकारे ड्रेस कोड तयार केल्याचे विद्यर्थ्यांच्या एका गटाने सांगितले. तसेच या निर्णयाविरोधात निदर्शने करणार असल्याचेही या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयाची निंदा केली आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे यापूर्वी केरळमधील एका मुस्लीम महिला महाविद्यालयातही घट्ट जीन्स, छोटे टॉप तसेच लेगिंग वापरावर बंदी घातली होती. खाप पंचायतींनीही अशा प्रकारे अनेक निर्णय दिले आहेत.

Leave a Comment