ईएमव्ही चिपसह येणार नवी क्रेडिट डेबिट कार्ड

credit
कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने घोडदौड करत असलेल्या भारतात ग्राहकांना बँकातर्फे दिली जाणारी क्रेडीट व डेबिट कार्ड अधिक सुरक्षित करण्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. रिझर्व्ह बँकेने अशी कार्ड देणार्‍या बॅकांना सप्टेंबरपासून दिली जाणारी कार्ड ईएमव्ही चिपसह देण्याचे आदेश जारी केले आहेत. कार्डच्या माध्यमातून होत असलेला फ्रॉड रोखण्यासाठी त्याची मोठी मदत मिळणार आहे.

पिनसह ईएमव्ही कार्ड ही ग्लोबल स्टँडर्ड क्रेडीट व डेबिट आधारित चिप प्रणाली आहे. ईव्हीएम याचा अर्थ युरो पे, मास्टरकार्ड व व्हिसा असा आहे. यात मायक्रोप्रोसेसिंग चिप असते व त्यासाठी पिन असणेही गरजेचे असते. यामुळे कार्डाचा वापर करणाराच खरा कार्डधारक आहे याची ओळख पटविता येते. या कार्डमध्ये मॅग्नटिक स्ट्रीपऐवजी ईएमव्ही चीप बसविलेली असते. यामुळे तुमचा डेटा अथवा पिन डुप्लीकेट करता येत नाही तसेच हॅकही करता येत नाही. यामुळे या कार्डांचा वापर करून फ्रॉड करणे अवघड बनते असे समजते.

Leave a Comment