आता मानवी मेंदूचाही ‘बॅकअप’ ठेवता येणार

brain
न्यूयॉर्क : संगणकप्रणित अनेक वस्तूंचा किंवा सॉफ्टवेअर्सचा बॅकअप घेण्याविषयी आता काही नवल नाही. मात्र, मानवी मेंदू बॅकअप करून ठेवता येईल का? याचे उत्तर नक्कीच होय असे असेल. कारण, भविष्यात गैरजैविक बुद्धीच्या प्रभावामुळे ते शक्य होऊ शकणार आहे. मानवी मेंदूची संगणकाशी तुलना काही नवल नाही. परंतु, भविष्यात

मानवाचा मेंदू संगणकाच्या कृत्रिम मेंदूपेक्षा अधिक बुद्धिमान होईल, यात काही शंका नसल्याची भविष्यवाणी गुगल आणि टेक-३० चे अभियांत्रिकी संचालक रे कुर्जवेल यांनी केली आहे. ते एक्सपोटेन्शिअल फायनान्स कॉन्फरन्समध्ये बोलत होते. ते म्हणाले, २०३० पर्यंत आपला मेंदू हजारो संगणकांच्या क्लाऊडशी जोडण्यास सक्षम होईल. हे संगणक आपल्या विद्यमान बुद्धीत वाढ करतील.

नॅनोबोट्सच्या माध्यमातून मानवी मेंदू जोडला जाईल. डीएनएच्या पेशींपासून नॅनोबोट्स हे सूक्ष्म रोबोट तयार केले जातील. कुर्जवेल पुढे म्हणाले की, तेव्हा आपली विचार समजून घेण्याची क्षमता जैविक तसेच गैरजैविक असेल. हजारो संगणकांपासून तयार क्लाऊड जेवढा मोठा आणि जटिल असेल तितकाच आपल्या बुद्धीचाही अधिक विकास होईल. हे २०३० च्या दशकाच्या शेवटी किंवा २०४० च्या दशकाच्या सुरुवातीला शक्य होईल, असेही ते म्हणाले.

Leave a Comment