झुकेरबर्गच्या कुत्र्याचे २१ लाख चाहते !

zukerberg
कॅलिफोर्निया : फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसीला यांनी त्यांच्या बिस्ट नावाच्या कुत्र्याचे फेसबुक पेज तयार केले आहे. तसेच त्याला २१ लाखापेक्षा अधिक लाईक्सही मिळाल्या आहेत. मार्क यांनी फेसबुकद्वारे बुधवारी ‘बिस्ट’ च्या पेजची लिंक शेअर केली आहे.

‘बिस्ट’ नावाच्या या कुत्र्याचे ‘बिस्ट’ या नावानेच फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत या पेजला २१ लाख २१ हजार २३० लाईक्स मिळाल्या आहेत. या पेजवर मार्क आणि प्रिसीला कुत्र्याच्या भूमिकेतून पोस्ट करत असतात. त्यामध्ये कुत्र्याला फिरायला नेताना, कुत्र्याच्या जन्मदिनानिमित्तचे छायाचित्रे तसेच कुत्र्याला दिलेला नाष्टा वगैरे यांचे छायाचित्रे पोस्ट केली जातात. विविध पोस्टाला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत असून हजारो लाईक्स मिळत आहेत. पब्लिक फिगर म्हणून तयार करण्यात आलेल्या ‘बिस्ट’ पेजमध्ये हा कुत्रा हंगेरियन शिपडॉग या प्रकारातील असल्याचे म्हटले आहे. तसेच मार्क आणि प्रिसीला हे मालक असल्याचे म्हटले आहे. मार्क यांनी त्यांच्या स्वत:च्या प्रोफाईलवरून बुधवारी ‘बिस्ट’ ची लिंक शेअर केली आहे.

Leave a Comment