एचटीसी आणणार दोन टेराबाईट मेमरीचा फोन

htc
नवी दिल्ली- लवकरच बाजारात एचटीसीचा फ्लॅगशिप मोबाईल एचटीसी वन एमई येत असून ड्युएल सिम असलेल्या मोबाईल फोनची एक्सपांडेबल मेमरी दोन टेराबाईट आहे.

फोनमध्ये ८ कोर मिडियाटेक हिलियो एक्स १० प्रोसेसर आहे. त्याची स्पीड २.२ गीगी हार्ट्झ आहे. ३ जीबी रॅम, ५.२ इंच एम ई, अॅंड्रॉइड ५ ऑपरेटिंग सिस्टम ही या फोनची वैशिष्ट्यै आहेत. फोनचे स्क्रीन रिजोल्यूशन १४४० x २५६० आहे. या फोनला ३२ जीबी इंटरनल मेमरी आहे तर ती २ टेराबाईट पर्यंत एक्सपांड करता येते. या फोनची किंमत ४०,५०० रुपये आहे.

Leave a Comment