सॅमसंग तीन महिन्यात लाँच करणार १० स्मार्टफोन

samsung
भारतीय बाजारात मिड रेंज स्मार्टफोन क्षेत्रात चिनी कंपन्यांनी निर्माण केलेले आव्हान मोडून काढण्यासाठी कोरियन इलेक्ट्रोनिक्स जायंट कंपनी सॅमसंग जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात १० मिड रेंज स्मार्टफोन लॉच करत असून कंपनीचे हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे लाँचिंग आहे. हे सर्व स्मार्टफोन ९ हजार ते १८ हजार रूपयांच्या रेंजमधील असतील असे समजते.

या मिडरेंज स्मार्टफोनच्या लॉचिंगमधून कंपनी मायक्रोमॅक्स, लेनोवो, मोटोरोला, जियोनी या कंपन्यांवर मात करण्याच्या प्रयत्न करणार आहे. या कंपन्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर आणलेल्या मिडरेंज स्मार्टफोन्समुळे सॅमसंगचा मार्केट शेअर गेल्या तीन महिन्यात घसरला आहे. सॅमसंग इंडियाचे नवे अध्यक्ष एच. हॉन्ग यांनी ही नवी निती आखली आहे. भारतात कंपनीला मिळणार्‍या एकूण महसूलापैकी ७० टक्के महसूल हा स्मार्टफोन विक्रीतून मिळतो. बाजारात उतरविण्यात येणारे नवे स्मार्टफोन युनिक मॉडेलचे असतील आणि सब ब्रँड जे सिरीजने लाँच केले जातील असे समजते. या स्मार्टफोनच्या हँडसेटचे उत्पादन भारतातच केले जाणार आहे आणि हे सर्व फोन फोर जी नेटवर्कला सपोर्ट करतील.

पुढच्या महिन्याच्या सुरवातीला गॅलेक्सी जे सेव्हन, जे फाईव्ह लाँच केले जातील तर सप्टेंबरमध्ये कंपनी फ्लॅगशीप मॉडेल गॅलेक्सी नोट फाईव्हचे पुढचे मॉडेल लाँच करणार आहे.

Leave a Comment