रेल्वेने सुरु केली अर्लट सेवा सुरु

sms
नवी दिल्ली: तिकीट रद्द झाल्यावर आता प्रवाशांना एसएमएस अलर्ट पाठवणे भारतीय रेल्वेने सुरु केले आहे. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली. ही सेवा तात्पुरती सुरु करण्यात आली असून काही दिवसातच सगळ्या प्रवाशांसाठी ही अर्लट सुरु करण्यात येणार आहे.

संपूर्ण देशात आम्ही २१ जूनपासून एसएमएस सेवा सुरु केली असून पायलट योजनेअंतर्गत आम्ही त्याच प्रवाशांना एसएमएस पाठवित आहोत ज्यांचा प्रवास पहिल्या स्थानकापासून सुरु होत आहे. नंतर इतर स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांसाठीही ही सेवा लागू करण्यात येणार असल्याचे मत रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अनिल कुमार सक्सेना यांनी व्यक्त केले.

रेल्वे तिकीटसाठी भरण्यात येणाऱ्या फॉर्मवरील मोबाइल क्रमांकावर हा एसएमएस तुम्हांला मिळणार आहे. तिकीट रद्द झाल्यास त्याच्या काही वेळ आधी प्रवाशांना एसएमएस पाठविण्यात येते जेणेकरुन त्यांना दुसरी काही व्यवस्था करता येईल. यामुळे तिकीट आरक्षित करण्यासाठी जो फॉर्म भरण्यात येतो त्यावेळेस न विसरता तुमचा मोबाइल क्रमांक द्या असेही सक्सेना म्हणाले.

Leave a Comment