स्टेफी ग्राफ होणार केरळ टुरिझमची ‘ब्रँड अँबेसिडर’

steffi
त्रिवेंद्रम : टेनिसची सम्राज्ञी स्टेफी ग्राफ ही केरळ टुरिझम विभागाची ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून निवडली जाण्याची शक्यता आहे. तिने मान्यता दिल्यास तिच्यावर केरळच्या जगप्रसिद्ध आयुर्वेदाचा प्रसार करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

केरळ टुरिझम विभागाचा ‘ब्रँड अँबेसिडर’ नियुक्त करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असून या यादीत स्टेफीसह बॉलीवूडचा सुपरस्टार किंग खान आणि अन्य सेलिब्रिटीजचा समावेश आहे.

स्टेफी ग्राफने आपल्या टेनिस कारकीर्दीत तब्बल २२ वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे. आपले सौंदर्य आणि खेळातील अद्वितीय कौशल्य आणि सातत्य यामुळे ती टेनिसमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखली जाते. स्टेफी ही आयुर्वेदाचा जगभर प्रसार करण्यासाठी सर्वाधिक लायक व्यक्ती आहे, असा केरळच्या पर्यटन विभागाचा विश्वास आहे.

Leave a Comment