चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या गणपतीसाठी ६० विशेष गाड्या

kore
मुंबई – कोकणातील घराघरांत यंदाही साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने ६० विशेष गाड्या सोडल्याची घोषणा केली आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि दादर येथून मडगाव व सावंतवाडी येथे जाणाऱ्या या गाड्या १० सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. ०१००१ डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव ही गाडी ११ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत गुरुवार सोडून इतर सहा दिवस मुंबईहून मध्यरात्री १२.२० वाजता निघून त्याच दिवशी दुपारी २.१० वाजता मडगावला पोहोचेल. ०१००२ अप मडगाव-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी मडगावहून गुरुवार वगळता आठवड्यातील सहाही दिवस दुपारी २.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता मुंबईत पोहोचेल. या दोन्ही गाड्यांच्या मिळून ३४ फेऱ्या गणेशोत्सवादरम्यान चालवल्या जातील. ०१०३३ डाऊन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव ही गाडी १० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत दर गुरुवारी मुंबईहून मध्यरात्री १२.२० वाजता निघून त्याच दिवशी दुपारी २.१० वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर ०१०३४ अप मडगाव-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी दर गुरुवारी दुपारी ३.२५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता मुंबईत पोहोचेल. या दोन्ही गाड्यांमध्ये वातानुकूलीत टू टियरचा एक डब्बा, वातानुकूलीत थ्री टियरचे दोन डबे, शयनयान श्रेणीचे ११ डब्बे आणि दोन साधारण श्रेणीचे डब्बे असतील. तर ०१०९५ डाऊन दादर-सावंतवाडी ही गाडी ११ सप्टेंबरपासून आठवड्यातील रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी दादरहून सकाळी ७.५० वाजता निघेल. ही गाडी सावंतवाडी येथे त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पोहोचेल. तसेच ०१०९६ अप सावंतवाडी-दादर ही गाडी १२ सप्टेंबरपासून दर सोमवार, बुधवार आणि शनिवार या दिवशी सावंतवाडीहून पहाटे ४.५० वाजता निघून त्याच दिवशी दुपारी ३.५० वाजता दादरला पोहोचेल. या सर्व गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहेत.

Leave a Comment