ओप्पोचा स्टायलीश नियो फाईव्ह दाखल

noyo5
चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने त्यांचा आणखी एक स्लीक व स्टायलिश स्मार्टफोन ओप्पो नियो फाईव्ह भारतात आणला असून त्याची किंमत आहे ९९९० रूपये. त्याची विक्री सुरू झाली आहे आणि ई कॉमर्स साईट आणि कोणत्याही बड्या इलेक्ट्रोनिक्स स्टोअर्समध्ये हा फोन ग्राहकाला मिळू शकणार आहे.

या फोनसाठी कलर ऑपरेटिंग सिस्टीम २.०.१ आय दिली गेली असून ती अँड्राईड ४.२.२ वर आधारीत आहे. फोनला ४.५ इंचाचा आयपीएस डिस्प्ले स्क्रीन, ड्रागन टेल ग्लास प्रोटेक्शन, ड्युअल सिम, ८ एमपीचा रियर तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. थ्री फिगर स्वाईप आणि स्कीन ऑफ जेस्चस सारखी शानदार फिचर्सही उपलब्ध आहेत. फोनला ८ जीबीची इंटरनल मेमरी आहे आणि कार्डच्या सहाय्याने ती ३२ जीबी पर्यंत वाढविता येते. ब्ल्यू टूथ, वायफाय, जीपीएस, मायक्रो यूएसबी अशी कनेक्टीव्हीटी ऑप्शन आहेत. फोनचे वजन आहे १३५ ग्रॅम.

Leave a Comment