फेसबुकचे फोटो शेअरिंगसाठी नवे अॅप

facebook
मुंबई: फेसबुकने आपल्या स्मार्टफोनवरील खास फोटो शेअर करण्यासाठी एक नवे अॅप तयार केले असून सध्या हे अमेरिकेत हे अॅप लाँच केले आहे. फोटो शेअर करण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप फ्लिकर, इंस्टाग्राम याप्रमाणे आहे. अॅपल आणि अँड्रॉईंड युजर्ससाठी तूर्तास हे अॅप सुरु करण्यात आले आहे.

तुम्ही शेअर केलेले फोटो या अॅपमुळे तुमचे मित्रही शेअर करु शकतात. तसेच त्यांचे फेसबूक फ्रेंडही हे फोटो शेअर करु शकतील. अनेकदा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गेलेले एखाद्या कार्यक्रमात आपण सगळे फोटो काढता. मात्र प्रत्येकाला वेगवेगळे फोटो देण्यापेक्षा या अॅपमुळे एकदाच फोटो सगळ्यांना मिळू शकतात, असे प्रोडक्ट मॅनेजर विल रुबेन यांचे म्हणणे आहे. तुम्ही मित्रांचे ग्रुप या अॅपमध्ये तयार करु शकतात. या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो शेअर करु शकतात.

Leave a Comment