फेसबुकवर धमकी दिली म्हणून दोषी ठरत नाही

facebook
वॉशिंग्टन : फेसबुकवर केवळ पोस्ट टाकून एखाद्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून, धमकी देणा-या व्यक्तीला दोषी धरता येणार नाही. एखाद्या व्यक्तीला इजा करण्याचा स्पष्ट उद्देश त्यात असल्याखेरीज तो दोषी ठरणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, त्याच वेळी न्यायालयाची ही भूमिका कायद्याच्या आधारावर आहे, फेसबुकवर पोस्ट केलेल्या विधानाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क देणा-या ‘फर्स्ट अमेंडमेंट’ चे संरक्षण आहे का, या मुद्द्यावर या निकालामध्ये मत व्यक्त करण्यात आलेले नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पत्नीपासून विभक्त झाल्याने संतापलेल्या इलॉनिसने तिला जिवे मारण्याच्या या कथित धमक्या फेसबुकवर दिल्या होत्या. त्यासाठी कनिष्ठ कोर्टाने त्याला तीन वर्षांचा कारावास व तीन वर्षांचे प्रोबेशन अशी शिक्षा दिली होती. एखाद्या व्यक्तीला इजा पोहोचवण्याची धमकी देणारा मजकूर प्रसारित करण्याच्या गुन्ह्याबद्दल त्याला कोर्टाने दोषी ठरवले होते.

Leave a Comment