१ जूनला येणार वनप्लसचा नवा स्मार्टफोन?

one-plus
मुंबई : चायनीज मोबाईल कंपनी वनप्लस ही लवकरच दुसरा स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता असून हा नवा स्मार्टफोन येत्या १ जून रोजी लॉन्च होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हॅण्डसेट लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने ट्विटरवर फोनचा टीझर जारी केला असून या टीझरमध्ये हॅण्डसेटला ‘टाइम टू चेंज’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. वन प्लस वन (OPO) ने बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनी कमी किंमतीत अतिशय चांगले स्मार्टफोन उपलब्ध करुन देते. वन प्लस वनला चांगला प्रतिसाद मिळाल्याने अशी अपेक्षा आहे की, कंपनी उत्तम फिचर असलेला स्मार्टफोन १ जून रोजी लॉन्च करु शकते. जाणकारांच्या मते या स्मार्टफोनची किंमत सुमारे २५ ते ३० हजार असू शकते.

Leave a Comment