विना विजेचे सर्व सुविधा देणारे घर

house
स्लोव्हाकियातील एका आर्किटेक्टने विजेशिवायही वर्षभर सर्व सोयीसुविधांसह आरामात राहता येईल असे घर बनविले असून त्याचे नामकरण इको कॅप्सुल असे केले आहे. अंड्याच्या आकाराच्या या घरात नळातून पाणी, फ्लश टॉयलेट, गरम पाणी, दिवे अशा आवश्यक सर्व सुविधा आहेत आणि त्या पुरविण्यासाठी सोलर पॅनल आणि विंड टर्बाइनचा वापर केला गेला आहे. विशेष म्हणजे हे घर कुठेही सहजतेने नेता येते आणि विविध परिस्थितीत ते वापरताही येते. या घरासाठी पावसाचे पाणी एकत्र करण्याची सुविधाही दिली गेली आहे.

हे घर 28 व 29 मे रोजी व्हिएन्ना येथे भरत असलेल्या फेस्टीव्हलमध्ये ग्राहकांना पाहता येणार आहे आणि आवडल्यास त्यासाठी या वर्षअखेर प्रीऑर्डर बुक करता येणार आहे. घराची डिलिव्हरी पुढच्या वर्षात जूनपर्यंत दिली जाणार आहे. रिसर्च स्टेशन म्हणूनही याचा वापर करता येईल तसेच इमारतींच्या टेरेसवर, बर्फात, वाळवंटात कुठेही ते उभे करता येईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment