महागात पडला सेल्फीचा मोह, जोडप्यावर हत्तींचा हल्ला

selfie
बंगळुरु – अनेक जणांना सेल्फीचे वेड लागले आहे. मात्र या मोहाला आवर घातला नाही तर, त्याच्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे लागेल.

सेल्फी काढण्याचा मोह कर्नाटकातील एका जोडप्याला चांगला अंगलट आला. हे जोडपं उटीला जात असताना रस्त्यात बंडीपूर येथे त्यांना दोन हत्ती दिसले. त्यांनी लगेचच मोबाईल काढला आणि या हत्तीसोबत सेल्फी काढला. मात्र, मोबाईलच्या फ्लॅशमुळे या हात्तींना त्रास झाला आणि त्यांनी चक्क या जोडप्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात हे जोडपे बचावले खरे, पण हत्तीने कारमध्ये सोंड घालून पिशवी काढली आणि इतर सामानांची नासधूस केली. त्या पिशवीत सोने आणि पैसे होते, असे या जोडप्याने म्हणणे आहे.

Leave a Comment